ब्रेकिंग न्यूज: नऱ्हे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना २४ तासांत बेड्या

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे:  पुणे शहरात महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी आपला कडक हिसका दाखवला आहे. नऱ्हे पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट-३ च्या संयुक्त पथकाने अवघ्या २४ तासांत थरारक कारवाई करत, कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. नऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गु.र.नं. १९/२०२६ नुसार, महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे, विजयसिंह घाडगे आणि गुन्हे शाखेचे पथक नऱ्हे परिसरात गस्त घालत होते.

तपास पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील दोन संशयित तरुण नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिर मागील गेट जवळ असलेल्या एका बंद मंगल कार्यालयाच्या मोकळ्या जागेत थांबले आहेत. या माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. यश सतीश खवले (वय २० वर्षे, रा. नऱ्हे, पुणे), ऋषिकेश उद्धव लाखे (वय २० वर्षे, रा. नऱ्हे, पुणे) पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी महामार्गावर जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली साधने आणि चोरीचा माल जप्त केला आहे, ज्यामध्ये ₹२,००,०००/- रोख रक्कम, एक ज्युपिटर मोपेड दुचाकी, एक लोखंडी कोयता (गुन्ह्यात वापरलेले शस्त्र), एक ॲपल (Apple) कंपनीचा मोबाईल (किंमत ₹३७,५००/-), एकूण मुद्देमाल: अंदाजे ₹३,०७,६००/- वस्तूंचा समावेश आहे.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त श्री. संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आसाराम शेटे (नऱ्हे पो.स्टे.) आणि श्री. प्रशांत अन्नछत्रे (युनिट-३) यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे, विजयसिंह घाडगे आणि पोलीस अंमलदार निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रनिल मेस्त्री तसेच युनिट-३ चे किशोर शिंदे, कैलास लिम्हन, पुरुषोत्तम गुनला आणि योगेश झेंडे यांचा समावेश होता.

  • Related Posts

    ब्रेकिंग न्यूज: बाणेरमध्ये दिवसाढवळ्या राडा! सुतारवाडीत चार अज्ञात चोरट्यांनी तरुणाला लुटले; ₹४० हजारांची रोकड लंपास

    खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात भरदिवसा प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे पोलिसांच्या बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २६ वर्षीय तरुणाला चार…

    ब्रेकिंग न्यूज: मार्केट यार्डात खळबळ! किरकोळ वादातून २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; एकाला अटक, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

    खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलून हत्या करण्याच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिबवेवाडी-कोंढवा रोडवर एका…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *