कोंढवा–कौसरबाग प्रभाग १९-ब : नाझिया समीर पंजाबी स्वतंत्र उमेदवार, विकासालाच प्राधान्य

खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- कोंढवा–कौसरबाग प्रभाग क्र. १९-ब मधील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले असून नाझिया समीर पंजाबी यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारीसंदर्भातील तसेच स्वतंत्र उमेदवारीसंदर्भातील दोन्ही फॉर्म माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारले आहेत. पक्षाच्या चिन्हावर कोण लढणार, याबाबतचा अंतिम निर्णय ३ जानेवारी रोजी अपेक्षित असून तो सध्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही संभ्रम किंवा वाद निर्माण होऊ नये म्हणून नाझिया समीर पंजाबी यांनी स्वेच्छेने स्वतंत्र निवडणूक चिन्ह स्वीकारून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागील भावना व्यक्त करताना नाझिया समीर पंजाबी म्हणाल्या, “माझं राजकारण कधीही सत्तेसाठी नव्हतं. ते नेहमी लोकांसाठी आणि विकासासाठी आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे प्रश्न मला रोज अस्वस्थ करतात, कारण हेच प्रश्न सामान्य नागरिकांनाही रोज भेडसावत आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या की, सध्या प्रभागात सुरू असलेल्या चर्चांमुळे आणि वादांमुळे लोकांमध्ये ताण, दुःख आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत होती. प्रभागातील माजी आमदार तसेच काही ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींनी देखील लोकांमध्ये नाराजी वाढत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
“हे ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. लोकांमध्ये फूट पडू नये, संबंध तुटू नयेत, यासाठी मी कोणत्याही दबावाशिवाय १ जानेवारीलाच स्वतः ठरवलं की मी स्वतंत्र उमेदवार म्हणून उभी राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नाझिया समीर पंजाबी यांनी हेही स्पष्ट केले की, पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत त्यांना कोणतीही हरकत नाही आणि तो निर्णय संबंधित पक्ष व माननीय निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकाराधीन आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या,
“मला धर्माच्या नावावरचं राजकारण नको. मला भांडण नको. मला फक्त आपला भाग सुधारायचा आहे.
No religion politics. Only development.
कोंढव्याचा विकास हाच माझा एकमेव उद्देश आहे

Related Posts

ब्रेकिंग न्यूज: बाणेरमध्ये दिवसाढवळ्या राडा! सुतारवाडीत चार अज्ञात चोरट्यांनी तरुणाला लुटले; ₹४० हजारांची रोकड लंपास

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात भरदिवसा प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे पोलिसांच्या बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २६ वर्षीय तरुणाला चार…

ब्रेकिंग न्यूज: मार्केट यार्डात खळबळ! किरकोळ वादातून २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; एकाला अटक, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलून हत्या करण्याच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिबवेवाडी-कोंढवा रोडवर एका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *